अशीच ती तुझी वाट पाहत असेल...

Started by टिंग्याची आई..., May 24, 2012, 04:00:30 PM

Previous topic - Next topic

टिंग्याची आई...

पहाटे अगदी सुर्याच्याही आधी उठून ,

न्हाऊ केल्यान तीच कोवळं सौंदर्य खुलत असेल,

ओल्या लांब सडक केसात हळुवार हात फिरवून ,

तुझ्या आठवणींचा गुंता ती सोडवत असेल,

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


बागेतल्या कळ्यांना स्वच्छंद खेळवून,

रोजच हा वारा तिच्या भेटीला येत असेल,

वसंतातील तीही एक नाजूक कळीच आहे अजून

पण वादळातही तुझ्यासाठी अखंड फडफडत असेल

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


क्षितिजाकडे एकटक पहाते किनार्यावर उभी राहून,

खोटीच का होईना पण सागर आणि आकाशाची भेट झाली असेल,

अथांग या सागराला उराशी कवटाळून,

तुझ्या मिठीत आल्याचा आभास तिला होत असेल,

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


संध्याकाळी उंबरठ्यावर एका पायावर भर टाकून,

चौकटीला टेकून, तुझ्या वाटेकडे पाहत असेल,

आसवानी भरलेल्या टपोर्या या डोळ्यातून,

तुझी हलकी तसवीर हळूच गाल कुरवाळत असेल,

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


कोटी नक्षत्रांच तिने पांघरून ओढलं असेल,

त्या तेजस्वी चंद्राच्या उशीवर हळूच डोकं ठेवून,

तुझ्या स्वन्पांच्या नगरीत ती राजकुमारी बेधुंद होत असेल

अशीच ती तुझी वाट पाहत असेल


उठ, घे भरारी , पंखातलं तुझ्या बळ एकवटून

शोध तिची नजर जी तुलाच शोधात असेल,

ती तुझं विश्व आणि तूच तिचा आधार , संग तिला जाऊन,

बघ.. .. हे ऐकून तिच्या डोळ्यात तेज आणि कंठात प्राण आला असेल,

आणि

तुझ्या मिठीत येऊन ती पुन्हा एकदा जिवंत झाली असेल..

अशीच ती तुझी वाट पाहत असेल..

केदार मेहेंदळे