स्वप्नपरी-२

Started by प्रशांत नागरगोजे, May 24, 2012, 07:20:06 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

"स्वप्नातली परी " ही कविता तुम्हाला आवडलीच, चला पाहूया ही कितपत आवडते. 

कुरळ्या केसांची, सावळ्या रंगाची
कोमल स्वरांची, परी लाजणारी
पहिल्याच नजरेत वेड लावणारी
ती स्वप्नपरी, माझ्या जीवाची 

आपल्याच धुन्धीत चालणारी
दुरून येता-येता, चोरून पाहणारी
भिडता नजरेला नजर, अनदेखे करणारी
ती स्वप्नपरी, माझ्या जीवाची 

मंद पावलांनी, जवळ येणारी
गीत प्रीतीचे, गुणगुणणारी
मंद स्मित गालांवर जपणारी
ती स्वप्नपरी, माझ्या जीवाची 

जाताना जवळूनी, स्पर्श करणारी
मग उगाच हलकेच, sorry म्हणणारी
जाऊनी समोर, गालांत हसणारी
ती स्वप्नपरी, माझ्या जीवाची 


बसुनिया नजदीक थोडे, गुणगुणणारी
पहावे मी तिला म्हणुनी, ती परी
मग उगाच मनाशीच बोलणारी
ती स्वप्नपरी, माझ्या जीवाची 

भिडता नजरेला नजर न्यारी
ती मंद स्मित करत पाहणारी
या जीवाला वेड लावणारी
ती स्वप्नपरी, माझ्या जीवाची 

आहे दूर आज ती बावरी
विसरलीही असेल मला कदाचित 
तरी आहे हृदयांत होऊनी ध्रुवतारा, ती परी
ती स्वप्नपरी, माझ्या जीवाची

                                        -आशापुत्र   


"Satisfaction is the ultimate aim of life." 
read @ www.prashu-mypoems.blogspot.com