कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

Started by Deepak Pardhe, May 25, 2012, 12:31:28 PM

Previous topic - Next topic

Deepak Pardhe

(मित्रांनो माझी पुढील कविता अथवा गाणं हे "श्री. व्ही. शांताराम" यांच्या "पिंजरा" या चित्रपटातील "कशी नशिबानं थट्टा आज मांडली" ह्या गाण्यावर साकारले आहे,
हे असे लिहिण्याचा माझा उद्देश एकच आहे कि, चालू असलेल्या असलेल्या भ्रष्टं कारभाराने आपण त्रस्त झालो आहोत आणि यातून तीच व्यथा मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे,
मी आशा करतो तुम्हाला माझ्या इतर कवितांसारख्या हि देखील आवडेल आणि तुमच्या प्रतिक्रिया मला मिळतील)

नाव : कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

दहा दिशांनी, दहा रावणांनी, मांडला तमाशा हो,
अत्याचारात दबली जनता, तुम्ही एका हो . . .

आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

गंगेमुळं निर्मळ होता असा एक देश . . . असा एक देश . . .
भिन्न इथल्या भाषा आणि भिन्न त्यांचे वेश . . . भिन्न त्यांचे वेश . . .
त्यांच्या सुखी संसाराची, वाट लावली . . .
कशी . . . सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

अश्या देशी कित्येक होते थोर मोठे पंत . . . थोर मोठे पंत . . .
पुण्यवान होती भूमी, जन्मले ते संत . . . जन्मले ते संत . . .
त्यांना भुक्या लांडग्यांची द्रुष्ट लागली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

भस्मासुर माजला इथं, महागाई झाली . . . महागाई झाली . . .
जगणं अगदी मुश्कील झालं, अशी वेळ आली . . . अशी वेळ आली . . .
कशी गरिबांवर ठिणगी आज पडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

भ्रष्टाचारी प्रवृत्तीनं, थयथायट केला . . . थयथायट केला . . .
राजकारणासाठी हो माणूस वेडा झाला . . . माणूस वेडा झाला . . .
त्यांनी गाठ माणुसकीची कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

टगेगिरी वाढली यांची, असे हे राव . . . असे हे राव . . .
जात धर्म नाही यांना, पैशाचे नाव . . . पैशाचे नाव . . .
त्यांनी गरिबांची नाळ कशी तोडली,
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

सामान्यांस कळला नाही, खोटा ह्यांचा खेळ . . . खोटा ह्यांचा खेळ . . .
बाजारात लुटला गेला, त्याचा जाई तोल . .  त्याचा जाई तोल . . .
त्याला कुत्र्या मांजराची दशा आणली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .
आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

आमचा देह, आमचा डोळा, आमचे मरण . . . आमचे मरण . . .
ह्यांनी असे रचिले देवा, आमचे सरण . . . आमचे सरण . . .
आमच्या फुटक्या कर्माची हि यात्रा भरली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

आमच्या खिशाची हि दोरी कशी सोडली . . .
कशी... सरकारनं हि थट्टा आज मांडली . . .

- दीपक पारधे

(माझ्या सगळ्या कविता वाचण्यासाठी माझ्या ब्लोग्सना जरूर भेट द्या : http://deepakpardhe.blogspot.in/)

balrambhosle

mast re..tu sadhyachi shiti khup chan mandli ahe..congress chya aai cha gho.......

Deepak Pardhe