ग्लोबलायझेशन

Started by mrunalwalimbe, May 25, 2012, 05:46:26 PM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe

ग्लोबलायझेशन
ग्लोबलायझेशन म्हणजे
आहे तरी काय?
मराठी शाळांना इग्रंजीच्या
कोंदणात बसवण तर नव्हे?
आमच्याच नाक्यावर
पिझ्झाचे दुकान काढून
आमच्या उडप्याला
देशोधडीला लावणे तर नव्हे?
आमचीच माती
त्यात उगवलेली फळे पण आमचीच
फक्त मोठे लेबल मात्र त्यांचे
म्हणजे परत आमचा शेतकरी रिताच
कंपन्या त्यांच्या
माणसे मात्र आमच्या मातीतील
कमी पगारावरती
अन् फायदा ,नफा मात्र सारा त्यांचा
परत आमचा माणूस उघडाच
ग्लोबलायझेशन मुळे जग आले जवळ
मात्र माणुसकी झाली पारखी
शेजारयाचा नाही ठाव
सातासमुद्रापार आहे मात्र भाव
हातात आहेत डॉलर खुळखुळणार
पण मन मात्र आहे मोकळ ठसठसणार
अरे करायचे काय
या ग्लोबलायझेशनचे
जिथे रक्ताची ओढच आटते


       मृणाल वाळिंबे


mrunalwalimbe


केदार मेहेंदळे