कर्मभोग

Started by शिवाजी सांगळे, July 14, 2026, 03:46:16 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कर्मभोग

योग वियोग, आयुष्यातले भोग सारे
ऐषाराम, कधी फरपटीचे दूर्योग सारे

इहलोकी नातीगोती,मैत्री, भेटीगाठी
विधिलिखित जुळलेले हे संयोग सारे

अपपर भाव अन् हेवेदावे तूझे माझे 
मानवी मनाचेच अवघे रे उद्योग सारे

पळवाट शोधण्या नित्य कष्टा पासून
मूढ मानव ठरवूनच करतो ढोंग सारे

प्रेम,आपुलकी, विरह न् दु:ख,दुरावा
जीवनातल्या स्थित्यंतराचे भोग सारे

सुटले ना, देव दानव, मानव त्यातून
कुणा न चुकले 'शिव' कर्मभोग सारे

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९