माझी कविता

Started by प्रशांत नागरगोजे, May 27, 2012, 12:30:44 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

कधी पहिला कोरा कागद की
शब्द घालतात मनात गोंधळ 
"मी आधी,मी आधी"
म्हणून करतात हट्ट वेड्यागत
मग करावा लागतो मलाही
विचार प्रत्येकाच्या सामर्थ्याचा
विचार शब्दाशब्दांच्या नात्याचा
हरवून जातो मग मी
करताना शब्दांची रचना
ओतावा लागतो जीव त्यांत
अन् जन्म घेते मग
माझी कविता
                           -आशापुत्र

follow my blog at www.prashu-mypoems.blogspot.com

केदार मेहेंदळे