दुर्दशा

Started by शिवाजी सांगळे, July 17, 2026, 02:44:52 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

दुर्दशा

कधी होते, पावसाची प्रतीक्षा     
कधी होते, त्याची पण उपेक्षा

तो कोसळो किंवा न कोसळो
गुपचुप बोलणी खातो हमेशा

अतिवृष्टी नाहीतर आहे कोरड
आपल्याच कर्माची, ही शिक्षा

मला वाटतं, आपणच कारण!
संपवून पर्यावरण केली दुर्दशा

करून सवरून नको ते उद्योग
उलट आम्हीच ठेवतोय अपेक्षा

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९