काय लिहावे आज, 'कारण' काही सुचेना मला

Started by umesh Tambe, June 01, 2012, 12:23:30 PM

Previous topic - Next topic

umesh Tambe

काय लिहावे आज, 'कारण' काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच आज येईना मला..

खोडकर आहे वातावरण, पण चिमटा काही बसेना मला
ध्यान लावून बसलोय खरं, पण वेध काही लागेना मला..

मोगरा फुलला, चाफा बहरला, सुगंध काही येईना मला
खूप काही सांगायचय, खूप काही बोलायचय,
पण माझं म्हणावं असं, ऐकणारं कोणी नाहीये मला..

पाउसही आतुर झालाय, चिंब चिंब करण्यास मला
पक्ष्यांची किलबिल प्रवृत्त करतीये, सूर काही नवे गाण्यास मला..

कठोर झालंय मन, कोमेजून गेलंय तन, तरी भावना काही आवरेना मला
शांत झालोय, स्तब्ध झालोय, माझा मीच काही केल्या सापडेना मला..

काय लिहावे आज, 'कारण' काही सुचेना मला
उसंत आहे, शब्द आहेत, 'आठवण' कोणाचीच आज येईना मला..


--
आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू विजयाची सवयच आहे, हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकायचा कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे....
[/i] [/i]  

केदार मेहेंदळे