रंगकण

Started by शिवाजी सांगळे, July 21, 2026, 07:58:06 AM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

रंगकण

अजूनही मी जपले आहेत रंग नभातले
मिसळले होते, कधीकाळी रंग प्रेमातले

का न कळल्या, छटा तुला कधी त्यांच्या
कित्येक वर्ख, भावनांचे त्यावर लेपलेले

दाटून येते मन, मेघांसम एकट्यात कधी
स्मरते का?तूच होते कधी त्या व्यापलेले

बरे आहे अताशा आकाश माझे मोकळे
दिल्या घेतल्या अनुभवांनी झाकोळलेले

भ्रम म्हणावा की वेडेपणा नुसता मनाचा
शोधतोय रंगकण आसमंतात विखुरलेले

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९