मन असेही ...मन तसेही

Started by Suhas Phanse, June 02, 2012, 01:48:30 PM

Previous topic - Next topic

Suhas Phanse

मन असेही ...मन तसेही
गगन सदृश मन अगम्य । गहन सागराशी साम्य ॥१॥
मन खंबीर खडकासमान । मन अस्थीर वाऱ्यासमान ॥२॥
कधी राग द्वेष वैऱ्यासम । कधी करुणा दया बंधुप्रेम ॥३॥
वाऱ्यासम कधी सुसाट । कधी स्तब्ध नाही कलकलाट ॥४॥
संवेदनशील सुर मन । असुर क्रूर अमानुष मन ॥५॥
मन राम पतित पावन ॥ मन बुद्धीभ्रष्ट रावण ॥६॥ 

केदार मेहेंदळे



मिलिंद कुंभारे

खूप छान आहे कविता!

मन राम पतित पावन ॥ मन बुद्धीभ्रष्ट रावण ॥६॥   :) :) :)