युगांत

Started by शिवाजी सांगळे, July 22, 2026, 08:59:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

युगांत

एक एक पर्व, येते जाते
उदय अस्त होत असतो
न् लढाईत अस्तित्वाच्या
व्यवस्थेचाही, अंत होतो

मात्र भास आभास फक्त
शाश्वत, असे काही नाही
सुखदुःखाच्या चष्म्यातून
जो तो केवळ पहात राही

मी, माझं, मला असल्या
जरी केल्या किती वल्गना
युगांत होताना या चराचरी
कुणाचाही पार हो लागेना

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९