आठवण काढू नकोस

Started by umesh Tambe, June 06, 2012, 04:04:29 PM

Previous topic - Next topic

umesh Tambe

आठवण काढू नको म्हणालीस
तरी ते शक्य आहे का?
तुझ्या पासून वेगळं होवून
माझ्या जीवनाला काही अर्थ आहे का....???

तुझ्या इतक समजून घेणारी मला
दुसरी कोणी मिळेल का..???
आणि जरी मिळाली
तरी तुझ्या डोळ्यातलं प्रेम
मी तिच्या मध्ये शोधू शकेल का....??

तुझ्या मध्ये मिळणारा आधार
तुझी माझ्यासाठी असलेली काळजी
ह्या गोष्टी मला दुसरी मध्ये नाही सापडणार
कारण .., तू ति आहेस जिच्यासाठी मी जगतोय
आणि तू म्हणतेस आठवण काढू नकोस......

तुझी आठवण न काढता माझ्या जगण्याला तरी काही अर्थ असेल का.....?


केदार मेहेंदळे