भांड्ताना

Started by विक्रांत, June 07, 2012, 10:40:48 AM

Previous topic - Next topic

विक्रांत

भांड्ताना भांड भांड
लाज थोडी सांड
त्वेष परजून थोडा 
डोळ्यामध्ये मांड

जर इथे लाजला 
शब्द आत गिळला 
लढ्याविन समज तू 
आज इथे हारला

भांडणात न्यायासाठी
मुळीच पाप नाही
भेकडाना जगण्यासारखा
मोठा शाप नाही


केदार मेहेंदळे