हे खरच आहे ना !!

Started by mvd76, June 08, 2012, 11:00:04 AM

Previous topic - Next topic

mvd76

  खरच ना......!
हे स्वप्नं तर नाही ना ?
माझ्या जीवनात तुझे येणे,
हा भास तर नाही ना ?

संकटे, निराशा आणि त्रास
जीवनात आजवर ह्यांचाच होता सहवास
वाटू लागले होते, हीच कटू सत्ये;
म्हणजे जीवनाचा प्रवास.....

स्वतःला समजावले होते.."एकला चलो रे !"
हाच जीवनाचा मार्ग
बाकी सर्व केवळ वल्गना
परी कथेतील रम्य कल्पना

अशा निराशेच्या खायीत कोल्माड्ताना
ऐकू आली तुझी.....
हळूच घातलेली साद मला.
थोडे मागे वळून पहिले.....
आणि वळणच मिळाले जणू जीवनाला!!

ह्या वळणावर जीवनाच्या
नाही निराशेचा काटेरी मार्ग!
आशांच्या पुष्पमाला अन
स्वप्नांचे कुंजवन आहे.
तुझी प्रत्येक साद हि जणू......
कुंजवानातील वेणू नाद आहे.

दिशाहीन एका जीवनाला
असा अमृताचा मार्ग मिळणे.....
स्वप्नवतच आहे ना !!
साहजिकच म्हणून वाटले.....

हे खरच ना !
हे स्वप्नं तर नाही ना......
माझ्या जीवनात तुझे येणे....
हा भास तर नाही ना !!!

माधव
[/font][/font]

केदार मेहेंदळे