वारी विठ्ठलाची

Started by Umesh Mahadeo Todakar, July 28, 2026, 03:15:44 PM

Previous topic - Next topic

Umesh Mahadeo Todakar

इंद्रायणी चंद्रभागेसोबत एक दिवस

आषाढी वारीला आली

भक्तीमध्ये तल्लीन होत

विठ्ठल दर्शनाला गेली

 

 

विठ्ठल दर्शनासाठी सोबत

रांगेत उभा राहिली

चंद्रभागा सोबतीला

विठ्ठल नामी दंग झाली

 

तेवढ्यात अचानक समोरून एक

विठ्ठल भक्त आला

दोघींकडे बघत तो

अचंबित झाला .....

 

अशा कशा ग तुम्ही इथं

अस्वच्छ होऊन आल्या

ट्रकभर निर्माल्य घेऊन

इथं उभ्या राहिल्या

 

चंद्रभागा इंद्रायणीकडे बघत

हसत हसत म्हणाली

तुझ्या विठ्ठलासाठीच मी हे

निर्माल्य घेऊन आली

 

जशा आम्ही उभ्या आहोत

तशाच स्वीकारा आम्हाला

तुमच्यामुळेच आमची ही

अवस्था झाली आहे बघा

 

चालता चालता रांगेत इंद्रायणी

वारकऱ्यांशी बोलू लागली

तुमच्या निर्माल्यांमुळेच आमची

अशी अवस्था झाली ....

 

बोलत बोलत विठ्ठलाच्या

पायापाशी गेली

साकडे घालतो विठ्ठला तुला

चंद्रभागा बोलली .....

 

तुझ्याच वारकऱ्यांनी आमची

अशी अवस्था केली ....

गलिच्छगात्र होऊन मी

तुझ्या दर्शनाला आली

 

कामरेवरचा हात काढून

विठ्ठल तिला बोलला

तुमच्या स्वच्छतेची जबाबदारी

मी प्रशासनाला दीली .......

 

वारकरी माझा भोळा भाबडा

काय करील सांग ....

सोई सुविधेला मुकलाय तो

मग कसा राहील सांग ...

 

वरुणराजाला साकडं घालून

करतो तुम्हाला स्वच्छ

होऊ दे वारी वारकऱ्यांची

मग देतो तुमच्याकडे लक्ष

 

उमेश तोडकर ......