"एक शांत संध्याकाळ"

Started by raghav.shastri, June 12, 2012, 11:03:23 PM

Previous topic - Next topic

raghav.shastri

शांत नदी किनारी,
सूर्य जाई मालवूनी,
हातात हात घेउनी,
नयनात जाऊया हरवूनी...

गाऊया गीत प्रीतीचे,

हरपून भान जगाचे,
काही तू सांगावेस,
काही माझे ऐकून घ्यावेस...

मुक्या शब्दांचे भाव ओठी दाटून यावेत,

लाजताच तू, मी तुला मिठीत घ्यावे, 
एकांत असा मिळावा, स्वप्नामधील गांवा...
एकांत असा मिळावा, दोन प्रेमवेड्या मनांना....

- राघव

केदार मेहेंदळे

surekh kavita.... hmmmm...... kash... gele te diwas aamche.... aata fakt athvani.


Rupali Mohite