का रे तु असा करतोस.............!

Started by Vira, June 14, 2012, 01:28:29 PM

Previous topic - Next topic

Vira

का रे तु असा करतोस.............!



का रे तु असा करतोस,
मी तुझ्या जीतकी जवळ
येण्‍याचा प्रयत्‍न करते
तु मला तीतकीच परकी करतोस.

माझ्या विचारातही तूच रे
माझ्या ओठांवरही तूच रे,
माझ्या स्‍वप्‍नातही तूच रे
माझी एक मात्र आशा 
आणि त्‍या आशेतही तूच रे.

तुझ्यावीना मरेल रे मी
का कळत नाही तुला,
माझ प्रेम पटऊन देण्‍यासाठी
काय करु सांग नारे मला.

मरनाची भिती नाही रे मला
फक्‍त तुझी होऊन मरायच आहे,
हे एकच स्‍वप्‍न
जे तुझ्या सवे बघायच आहे.

मी तुझ्याकडे पाहील्‍यावर
तु चेहरा फिरऊन घेतोस,
तु माझा होनार नाही
याची जानिव का करुन देतोस.

माहीत आहे मला
तुला नकोशी आहे रे मी,
माझ्या मुळे तुला त्रास नको म्‍हणुन
आता तुझ्या जिवनातुन कायमची दुर जाते रे मी.

जाता जाता फक्‍त एकवेळा
प्रेमाच्‍या नजरेने बघ रे मला,
नंतर मग मी जगुन घेईल या गैरसमझुतीत कि
आवडते मी तुला
आवडते मी तुला.

- विरा


mylife777

कविता छान आहे. :) पण असे वाटते मुलीने  लिहिलेली  ... :)

Suparna S. A.

Khupch sundar aahe kavita,,,, agadi mazya war depend aahe as watatay.... ;)


Rupesh Naik

khup chaan lihili aahes....


मरनाची भिती नाही रे मला [/size]फक्‍त तुझी होऊन मरायच आहे, हे एकच स्‍वप्‍न जे तुझ्या सवे बघायच आहे. 


जाता जाता फक्‍त एकवेळा प्रेमाच्‍या नजरेने बघ रे मला, नंतर मग मी जगुन घेईल या गैरसमझुतीत कि आवडते मी तुला आवडते मी तुला. ........Farach chaan... :)

Narendra chaudhari

i think this was writed on my real situation and thanks so nice

DATTA SAPTALE