" परतीच्या वाटेवर "

Started by कवि - विजय सुर्यवंशी., June 15, 2012, 05:50:51 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

  " परतीच्या वाटेवर "
.
.
.
परतीच्या वाटेवर , तुझ्या स्टॉपवर ,
गाड़ी आज थांबलीच नाही.....
कडाडणाऱ्या मेघासोबत,
विज आज चमकलीच नाही.....
.
.
.
मग चातकासारख मी ही ,
तुला शोधत होतो.....
पावसात भिजुनसुधा ,
मनाने मात्र कोरडा होतो....
.
.
.
भिजलेल्या आपल्या आठवणीला,
तुझ्याच भावनेच आंदण होतं....
विस्तारलेल्या माझ्या नभात,
तुझ्याच चांदण्याचं कोंदण होतं.....
.
.
.
मग खिड़कीतच बसलो,
पावसवारती लिहायला....
जवळ हवी होतीस तु,
माझ्या कविमनाला दाद द्यायला....
.
.
.
तुझ्यासवे आरूढ़ व्हायचय मला,
या स्वप्नांच्या सरीवर.....
सखे पुन्हा भेटशील का??
त्याच आपल्या परतीच्या वाटेवर....
.
.
.
कवि - विजय सूर्यवंशी .
       (यांत्रिकी अभियंता)

केदार मेहेंदळे


Sushmita Pawar

खुप छान कविता आहे, मला खुप खुप आवडली. 

मग चातकासारख मी ही ,
तुला शोधत होतो ...
पावसात भिजुन सुधा ,
मनाने मात्र कोरडा होतो ....


या चार ओळी तर खुपच छान.  अगदी एखाद्या च्या मनातले तु कविते रूपी प्रकट केल आहेस,  तुझ्या आणखीन कविता आहेत का ? मला कुठे वाचायला मिळतील ?

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

कवि - विजय सुर्यवंशी.

#4
आणखी कविता मी पोस्ट करेन याच वेबसाईटवर .... thanks Sushmita.

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे श्रीकांत आणी केदार सर...

sweetsunita66


कवि - विजय सुर्यवंशी.


Pratej10

तुझ्यासवे आरूढ़ व्हायचय मला,
या स्वप्नांच्या सरीवर.....
सखे पुन्हा भेटशील का??
त्याच आपल्या परतीच्या वाटेवर....

Khoop chan :)

कवि - विजय सुर्यवंशी.

आभारी आहे प्रतेज.... :)