शब्द कवितेतले ....

Started by madhura, June 16, 2012, 07:13:31 PM

Previous topic - Next topic

madhura

सुनील जोशी यांची एक अप्रतिम कविता सदर करत आहे ....


शब्द कवितेतले ....
अक्षर अक्षर जोडिले
शब्द शब्द जुळले
भाव त्यात ओतता
अव्यक्त व्यक्त जाहले

मूक शब्द जागले
भाव डोलू लागले
मुका बोलता बघता
जग़ अचंबित जाहले

कुणा काही भावले
कुणी काही नावाजले
नावाजण्याविना जे राहिले
शब्द तेहि होते भले

अक्षर शब्द आपुले
जीवा भावाने लिहिलेले
पसंती नापसंतीस उतरले
शब्द माझ्या कवितेतले ....

-- By सुनील जोशी

केदार मेहेंदळे


umesh Tambe


shashaank