पत्र-कविता

Started by janki.das, June 16, 2012, 07:27:59 PM

Previous topic - Next topic

janki.das


पत्राला , जोडावी म्हणतोय कोरी पानं थोडीशी..
अन करेन म्हणतोय त्यावर एक कविता कोरीशी ..!!

अगदी अलवार ओठांवर येऊन थांबलेली..
आठवांनी आपल्या नखशिखांत सजलेली ..!!

'श्री' च्या जागी सजवेन चंद्र तुज्या बिंदीचा ..
रंग भरेन त्यात वाट पाहणा-या मेहंदीचा .. !!

जिथे लिहितात 'प्रिय', तिथे माझे ओठ टेकवेन ..
अन चोरट्या त्या क्षणांना तुला पुन्हा भेटवेन..!!

'पत्रास कारण' म्हणून एक फूल पाठवेन मोग-याचं..
जे जपून ठेवलंय कधीचं तू माळलेल्या गजा-याचं ..!!

'मायन्यामध्ये', कविता लिहीन ,अन ठेवेन एक कळी ..
अन त्यात स्वल्पविरामासारखी मांडेन तुझी खळी..!!


निरोप घेताना पत्रात ,चारोळ्या टाकेन खास खास ..
मिठी बिठी शब्द वापरून देयीन हलकासा भास ...

नेहमीप्रमाणे 'तुझा' च्या पुढे, नाव लिहीन माझंच ..
अन तू ते वाचून मनात म्हणशील माझाच !!

आता या पत्रावर तुझा पत्ता लिहावा म्हणतोय ...
पत्त्याच्या जागेवर सये काळीज काढून ठेवतोय ..
पत्त्याच्या जागेवर सये काळीज काढून ठेवतोय !!


-विनायक उजळंबे

केदार मेहेंदळे