तुझ्या माझ्या पावसाळ्यात..

Started by shashank pratapwar, June 18, 2012, 10:42:59 PM

Previous topic - Next topic

shashank pratapwar


तुझ्या माझ्या पावसाळ्यात..
दोघांनीही संपून जायला हव होत..
अधुऱ्या कथेचे भरकटलेले संदर्भ..
कोंडून ठेवतात आपल्या मनाला..
होइल का असा अमृताचा शिडकाव.
की सगळ्या आठवणी धुतल्या जातील..?
आणि त्या कोऱ्या मनावर ..
स्वप्नांची अक्षरं पुन्हा उमटतील..?
विरहात कणा कणाने मिटण्यापेक्षा..
तुझ्यासवे तेव्हाच हसऱ्या डोळ्यांनी ..
देहातीत व्ह्यायला पाहिजे होत..
असे शापित ऋतु भोगण्यापेक्षा..
तुझ्या माझ्या पावसाळ्यात..
दोघांनीही संपून जायला हव होत..

- शशांक प्रतापवार

केदार मेहेंदळे

होइल का असा अमृताचा शिडकाव.
की सगळ्या आठवणी धुतल्या जातील..?
आणि त्या कोऱ्या मनावर ..
स्वप्नांची अक्षरं पुन्हा उमटतील..?


khup chan...