हेच का रे प्रेम होतं ?

Started by Swarali Sante, August 10, 2026, 11:59:40 PM

Previous topic - Next topic

Swarali Sante



हेच का रे प्रेम होतं ?

पाहता सामोरे तुला जेव्हा कधी,
विचलित मन माझं नेहमी असायचं,
डोळे केंद्रित तुझ्यावर प्रत्येक क्षणी,
हेच का रे प्रेम होतं?

पडता कानी तुझ्या नावाचा ध्वनी,
हृदय तेव्हा माझं धडधड करायचं,
स्तब्ध व्हायची मी विसरून सारेकाही,
हेच का रे प्रेम होतं?

बोलता तू काही माझ्याशी कधी,
बेभान होऊन ऐकायचं मन माझं,
त्याक्षणी वाटायचं-वेळ इथेच थांबावी,
हेच का रे प्रेम होतं?

पाहता मी तुला तिच्यासोबत कधी,
भावनांच्या लाटांनी दुखायचं मन माझं,
कोपऱ्यात एका बसायची रडत मी,
हेच का रे प्रेम होतं?

प्रेमात तिच्याच होतास, कळलं एकेदिवशी,
दुःखांच्या टाचण्यांनी टोचून फार रडवलं,
सांभाळलं स्वतःला काहीतरी करून मी,
प्रेमच होतं हे तुझ्यासाठी माझं,
जे तुला कधी कळलंच नाही...


लेखिका -  स्वराली संते