आयुष्याची संध्याकाळ

Started by mrunalwalimbe, June 20, 2012, 12:12:20 PM

Previous topic - Next topic

mrunalwalimbe

आयुष्याची संध्याकाळ
आयुष्याच्या संध्याकाळी
मी हिशोब मांडला
काय कमावलं अन्
काय गमावलं
कमावलं पुष्कळ धन,
       संपत्ती, ऐश्वर्य
गमावलं मात्र सुखं, प्रेम,
         आपुलकी
आयुष्यात तरण्यासाठी  मी
धन कमवत गेलो
आयुष्य वेचत गेलो
मात्र स्वजनांना दुरावत गेलो
आता वाटे मज चार क्षण
      हातात आहेत
मौज करु यात
आप्तजनांना  सुखं देऊ यात
पण,
ते तर केव्हाच पुढे निघून
                गेलेत
अन्
मीच एकटा काठावर
        उभा   आहे
बेरीज ,वजाबाकीचा हिशेब
                 जुळवत
                                 मृणाल वाळिंबे


please visit "http://mrunalwalimbe.blogspot.in/"

केदार मेहेंदळे


विक्रांत

#2
मृणालजी ,
तुमच्या कवितेवरून तुम्ही आयुष्याच्या संध्याकाळी आहात असे वाटत  नाही
पण  कविता म्हणजे परकाया प्रवेश असतो .हेही खरे .
विक्रांत

MK ADMIN


मीच एकटा काठावर
        उभा   आहे
बेरीज ,वजाबाकीचा हिशेब
                 जुळवत


Waaah !!!! Apratim..Keep it up.

mrunalwalimbe

धन्यवाद
सर्वाना आवडल्याबद्दल व कविता वाचल्याबद्दल