PAUS

Started by lelekedar, June 24, 2012, 04:08:39 PM

Previous topic - Next topic

lelekedar


रिमझिम रिमझिम अवनी वर
कोसळती धारा
थुईथुई थुइथुइ नाचत मोराने
फुलवला पिसारा
सळसळ सळसळ पानांनी
दिला इशारा
आला पाऊस आला

ओल्या ओल्या मातीचा
मृद्गंध दरवळला
दरी खोर्यातून वारा
बेभान सुसाटला
गर्जत गर्जत किनार्यावर
लाटा धडाडल्या
आला पाऊस आला

काळा काळा मेघ
पूर्ण रिता झाला
कोवळ्या कोवळ्या प्रकाशात
परिसर न्हाला
धर्तीच्या गर्भातून
नवअंकुर उमलला
आला पाऊस आला
आला पाऊस आला

Kedar Lele

केदार मेहेंदळे