श्रीहरी वाजवितो मुरली

Started by lelekedar, June 24, 2012, 04:33:53 PM

Previous topic - Next topic

lelekedar

श्रीहरी वाजवितो मुरली

सांज वेळी शांत समायी
कदम्ब वृक्षा तली
श्रीहरी वाजवितो मुरली

सांज पाउले पड़ता भूवर
सुरात भिजती सारे चराचर
प्रेम भक्तिच्या अनंत लहरी
उमटती कालिंदीच्या जळी

शांत पाखरे शांत गोधन
छेडी ताना तो मधुसुधन
आठवून अवघे सरे क्षण
राधा वेडी लाजली
श्रीहरी वाजवितो मुरली

मधुर स्वर पड़ता कानी
गोपी नाचती भान हरापुनी
कृष्ण सख्याची साऱ्या गोकुली
रास लीला रंगली
श्रीहरी वाजवितो मुरली

केदार




केदार मेहेंदळे