आलं धरेवर

Started by Dr.Vinay Kalikar, June 24, 2012, 09:37:10 PM

Previous topic - Next topic

Dr.Vinay Kalikar

मातीमध्ये ओल्या
गंध या नभाचा,
पानामध्ये हिरव्या
गंध आभाळाचा.

हिरवी झाली पाने
हिरवी झाली राने,
हिरवा ओघळला
रंग आभाळाचा.

पक्षी गती गाणे
गाणे तरुवेलींचे ,
हिरवे हिरवे गाणे
गाणे आभाळाचे.

खळखळ पाण्यात
होडी घन-मेघांची ,
नदीत उसळला
थेंब आभाळाचा .

आभाळ हे असं
आलं धरेवर,
मातीला मिळाला
जीव आभाळाचा.

___विनय काळीकर____
___नागपूर__________

केदार मेहेंदळे