पावसा...

Started by हर्षद कुंभार, June 24, 2012, 11:36:41 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


आज बरसलास तू इतक्या दिवसांनी...
का काहीच कसे वाटत नाही तुला,
कोण वाट पाहत असेल ...
का जाणवत नाही तुला,


एक तर आधीच असतोच...
फक्त तीनच महिने,
त्यातपण तुझे आधीच...
ठरलेले असते उशिरा येणे.


तुझ्या चाहुलीनेच फक्त...
इथे कवींचे होते काव्यरूप बरसणे,
तुझ्या कल्पनेने सगळ्यांना...
अगदी चिंब चिंब भिजवणे.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार