डोराल

Started by sandhya09, August 19, 2026, 03:50:41 PM

Previous topic - Next topic

sandhya09

नवविवाहित ती संसारात शिरली,
थोडीशी बारीकशी, थोडीशी सावळी...

हातात चुडा, डोळ्यांत काजळ
माथ्यावर कुंकू, नि गळ्यात डोराल .

घालमेल नि जाणीव जवळीकीची,
नजर खाली, पण ओढ तिला अहोंची.

धाक आवाजाचा, मनात काहूर,
हलका सा स्पर्श नि एकच हुरहूर.

लावता देवाचा टिळक माथी,
साथ मिळे थोडी, हात जाई हाती.

नको नकोची भाषा, तिची,
नि न ऐकण्याचा हट्ट... त्याचा

गडबड, घाई करता करता,
बटणांत अडकल डोराळ.

डोळ्यांत धुंदी नि ओठांवर हसू,
कसं आवडलं, अहो, ना तिच ते फसणं...

डोराल सोडवता सोडवता,
धडधड काळजाची,

थांबले थरथरणारे हात,
मिळताच साथ नजरेची

थांब ना... अशी जवळ, थोडा वेळ...
नाही, नको... येईल कोणी, पाहील कोणी...ही घालमेल...

हक्काची भार्या माझी तू,
मग दूरदूर का तू?

 
डोराल मोकळ झाल...तरी ती नाही...
डोळ्यांत डोळे देऊन पाहत राहि...

एकांत हवा, मोकळा...डोराळला ओढ बसली...
"रात्रीच ओढ आहे.. रात्रीचं वचन देऊन ती हसली...


— संध्या
अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.