तो क्षण

Started by sandhya09, August 20, 2026, 09:47:57 AM

Previous topic - Next topic

sandhya09

तो क्षण, ती वेळ
आणि होता फक्त ओठांचा खेळ,

जेव्हा ती थोडीशी घाबरली, किंचितशी दचकली,
त्याच्या जवळ असूनही अलगद मागे सरकली.

जाणीव होताच तिच्या ओल्या सौंदर्याची,
मनात उमटली एक हळवी इच्छा, तिला स्पर्शण्याची.

थोडी नाजूकशी... थोडी लाजरी ती,
उत्कंठा जाणवली तिला जाणण्याची.

डोळे तिचे चंचल, आणि जलद श्वास त्याचे,
तो सावकाश पुढे सरकला, ती नकळत मागे झाली...

हात तिचे त्याच्या हातात अलगद गुंतले,
खाली थोडं झुकता, ती हलकेच फिरली.

छातीला त्याच्या ओल्या देहाचा तो स्पर्श,
मनात त्याच्या एक वेगळाच हर्ष.

साडी तिची ओलीचिंब,
केसांतून पाठीवर झिरपणारे थेंब.

मागून कवेत घेता, जाणवला तिचा शहारा,
हालचाल झाली, वर घेता तिचा चेहरा.

श्वासाची ती वरचढ, आणि ओठांची ती थरथर,
आता थांबणं नाहीच तर... अबोल ती हुरहूर...

तरी एकदा डोळ्यांनीच विचारलं,
मिळाला तिच्या बंद पापण्यांचा होकार.

त्या क्षणाला जपत, तो तिच्या जवळ आला,
हळुवार... अगदी हळुवार...

मानेवर हात जाऊन, थोडासा तो आक्रमक झाला,
ओठांत ओठ मिळता, भावनांचा एकच आवेग उसळला.

मऊ... मऊ... हलके... हलके...म्हणता म्हणता... तुटूनच पडला
कंबरेवर दाब देऊनी, बेभानच झाला.

पण तिच्या हाताचा हलका स्पर्श त्याच्या छातीवर जाणवला,
आणि तिच्या मनातील संकेत त्याला उमगला...

नको असताना... तिचा मान म्हणून,
तिथेच तो थांबला...

डोळ्यात तिच्या एक नवी नशा...
प्रेमात तिची त्याच्याकडून असणारी अपेक्षा,

फक्त तिच्याच कलेच घेण्यासाठी,
थांबला पुन्हा तिच्यात विरघळण्यासाठी.

स्पर्श दोघांनाही हवा असतो,
फक्त वेळ आणि क्षण असतो, एकमेकांना उमगण्यासाठी.

— संध्या09



अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.