अखेरचा तुम्हा दंडवत

Started by शिवाजी सांगळे, August 22, 2026, 09:18:14 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अखेरचा तुम्हा दंडवत

अखेरचा घ्या तुम्हा दंडवत
सोडून देतो मिडिया
ग्रुपग्रुप मधून खूप बोललो
नको आभासी दुनिया

त्यां सोबतीने उठलो बसलो
कधी कधी तोंडावर पडलो
अखेरीस रे सत्य समजलो
कळली बोगस माया

वाटे सोडून जावे आता
भासच अवघे उरती आता
कुणी कुणाचा नाही त्राता
वेळ जाते बघ वाया

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९