आज अचानकच तीझा फोन आला

Started by Rushi.VilasRao, August 23, 2026, 11:19:07 AM

Previous topic - Next topic

Rushi.VilasRao

आज अचानकच तीझा फोन आला...
तीचा तो बारीक आवाज मला भूतकाळात घेऊन गेला...
फोन वर बोलत असताना जुन्या आठवणींना उजाळा आला...
निसर्गाला जणू माझ्या मनातल्या भावना कळल्या आणि मुसळधार पाऊस चालू झाला...
हवेत मातीचा गंध मिसळला...
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram @K.rushi_bhaijaan
भूतकाळाच्या पटलावर उमटलेले ते कॉलेजचे दिवस,
कॉलेज चा तो कट्टा अन् तासंतास रंगलेल्या गप्पा...
एखादी वीज कडकडावी अशा वेगाने मन आठवणीत रंगून गेल...
पावसाचा जोर हळू हळू वाढत होता...
फोन वर शब्दांचा बांध फुलत होता...
शब्दांच्या बांधाला भूतकाळाचा वाईट दर्प न्हवता...
वेळ कसा निघून गेला कळलच नाही...
बोलू परत फावल्या वेळी म्हणत फोन आता ठेवून दिला...
पावसाचा तो वास आणि तिची ती मंद साद,
दोन्हींनी मिळून आजचा दिवस पूर्णत्वाला आला
फोन कट झाला, पाऊसही हळूहळू ओसरला,
पण मनात मात्र एका शांत, तृप्त आणि सुखावणाऱ्या तृप्तीची सर देऊन गेला...
Writer:- writer:- rushikesh kadam(मी स्वत:च)
Follow on Instagram @K.rushi_bhaijaan