आठवणी रेंगाळलेल्या

Started by शिवाजी सांगळे, August 24, 2026, 09:09:17 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

आठवणी रेंगाळलेल्या

आंबट काही गोड भोगलेल्या
आठवणी ह्रदयात कोरलेल्या

तरीही हवा नकोसा एक स्वाद
जगण्याला, या देऊन गेलेल्या

तुमच्या,माझ्या आणि सर्वांच्या
स्मरणात कायमच्या बसलेल्या

अशाच कित्येक हव्या नकोशा
विसरु म्हणता,ठाम रूतलेल्या

प्रत्येकाच्याच मनात असतात
काही "आठवणी रेंगाळलेल्या"

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९