कर्तव्य न् सल्ला

Started by शिवाजी सांगळे, August 27, 2026, 02:29:48 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

कर्तव्य न् सल्ला

सर्वत्र एफ् डी ए च्या
आता धाडी पडू लागल्या
कित्येक ठिकाणी हो
दुधाच्या नद्या वाहू लागल्या

जाणून कर्तव्ये कुणी
नियमात कामे करतो आहे
सामान्य जरा सुखावता
महागाईचा भडका होत आहे

रंगुनी लाल रंगात
चायनीज सारेच हो रंगलेले
"तुका" म्हणे आता
भेसळहीन खाणे खरे चांगले

©शिवाजी सांगळे 🦋 papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९