कीचेन

Started by sandhya09, August 31, 2026, 10:07:05 AM

Previous topic - Next topic

sandhya09

कोणी सांभाळ पायातल पैंजण
कोणी हातातल कंकण
कोणी गळ्यातली चेन
पण मला मिळाली तिची कीचेन
 
काय करावं टॉमबॉय मुलीचं
कौतुक भारी तिला, जीन्स नि टी-शर्टच!
कधी पाहिलंही नव्हतं आधी तिच्याकडे
तसं काही कारणही नव्हतं माझ्याकडे
 
पण अचानक एक पैजेपोटी
चक्क साडी नेसून आली ना पोट्टी
कोणी ओळखलं न कोणी ओळखलं नव्हतं
पण तिच्या पाठीवरचं गोंदण मी ओळखलं होतं
 
एक मोरपीस एक बासरी
म्हणजे हिच्या मनात होती एक राधा हसरी
साडी नेसली तर काही शृंगार नव्हता
फक्त काही घुंगरांचा आवाज होता
 
आवाज येतो कुठून, पाहिलं तर,
बॅगच्या कीचेनचे सूर आले कानावर.
पेहराव सोडला तर सर्वच स्त्री मनाचे भाव ते पुरेपूर
चेहऱ्यावर त्या पिवळ्या साडी रंगाचा ही नूर
 
त्या रात्री काही झोप लागली नाही,
डोळ्यांसमोरून तिची छबी काही हटली नाही.
दुसऱ्या दिवशी परत जुन्या अवतारात अवतरली,
पण माझ्या मनातली तीच प्रतिमा कायमची उतरली.
 
हळूच काढून घेतलं होतं ते कीचेन,
एकट्यात त्याचे सूर करत होते बेचैन.
शोधलं होतं तिने ते खूपदा,
त्याचे सूर ऐकले होते माझ्याकडून अनेकदा.
 
तिलाही अंदाज आला होता,
आजूबाजूला प्रेमाचा नूर पसरला होता.
मनात प्रेमाचा रंग भरला होता,
नजरे नजरेतून संवाद सुरू झाला होता.
 
काही केलं तरी सूर मिळत नव्हते,
मनातले शब्द ओठांवर येत नव्हते.
काय करावं मलाही कळत नव्हतं,
मन मात्र तिच्याच विचारांत हरवत होतं.
 
थोडं बोलायचं होतं तुझ्याशी, म्हणून सांगितलं तिला,
माझ्या मनातलं काही कळलं असेल, म्हणून प्रश्न पडले तिला.
नजर चोरून माझ्याशी बोलत होती,
पण नजरेतून मात्र भावना लपत  नव्हती.
 
तिच्याकडे पाहताना त्या दिवशी तिनेही पाहिलं होतं
कधी नव्हे त्या टॉमबॉयमध्ये काही हललं होतं
पुरुषीवस्त्रातील स्त्रीच मन लाजलं होतं
किती लपवलं तरी गालावर लाजेचं गुलाब उमललं होतं
 
समजून घेतल्या तिच्या डोळ्यांतील भावना,
तरी मनाला सोसवेना या प्रेमाच्या यातना.
मी तिला भेटायचं कित्येकदा ठरवलं होतं,
पण ती मुद्दाम दूरून जायची, हेही जाणवलं होतं.
 
एकदा तिला क्लासरूममध्ये गाठलं,
भीतीने तिला तिथून पळून जावंसं वाटलं...
हातात हात घेता नजर माझ्या नजरेत अडकली,
"नाही जमणार मला हे..." म्हणत ती हळूच बोलली...
 
कशाची भीती तुला, सांग सखे माझी,
वचन माझं — आयुष्यभर साथ देईन तुझी...तो
मोठे माझे कधीच नसतील माझ्या  पाठी,
मग का जुरावं कुणी आपल्यासाठी????ती
 
वाट पाहशील का माझी, मी तयारीनं येईन काही वर्षांनी,
तोपर्यंत जपून ठेव हे सौंदर्य माझ्यासाठी मनोभावांनी.
नाही येणार वाटेत तुझ्या, तुला त्रास द्यायला,
फक्त तीन वर्षं मागतोय, आयुष्यभर तुझी साथ द्यायला.
 
होकार दिला तिने भरल्या डोळ्यांनी,
न कळत दुराव्याआधी मिठी दिली प्रेमानी, 
आज चार वर्षं झाली त्या भेटीला,
आणि पूर्णत्व मिळतंय आज आमच्या लग्नगाठीला.
 
— संध्या
 
 koni kahi bolat nahi ithe... na suggestion na reply...
 
अनोळखी भावना ओळखताना
शब्दांत त्यांना गुंफताना
मी आहे ती जी तुला भेट घडवून देईन
तुझी तुझ्या भावनांशी.