प्रवास..

Started by Rohit Dhage, June 28, 2012, 11:59:52 PM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

हिरवी झाडं.. वाऱ्यावर डोलणारी शेतं.. नारळीच्या, केळीच्या बागा.. काळी माती.. पाटाचं वाहणारं पाणी.. निळं अथांग आकाश..
कुठं गोरंढोरं.. शेळ्या मेंढ्या.. कुठे कौलारू घरं, काटेकुटे, बाभूळ.. कुठे दगडी दोन चार बंगले.. बाजूला निलगिरी.. मधेच ढगांचा वेगळा मेळ.. कुठे दूरवर दिसणारी जमीन-अस्मानाची पोकळी.. कुठे ऊनपावसाची खेळी..
आणि दूरवर वाहणारा कच्चा पक्का एकेरी डांबरी रस्ता.. रस्त्यावरून चालणारी, सायकलवरची तशीच कच्ची पक्की वाटणारी लोकं..
त्यावरून सुसाट वाहणारी गुलबर्गा एस.टी. आणि त्यात मी!
दूरवर नजर टाकावी.. जेवढी जमेल तेवढी.. इथे तो पृथ्वीचा गोल जाणवतो.. अगदी चौखूर दिशांचा!
मग आठवतो.. शेवटचं कधी मी असं काही पाहिलं होतं ते.. खरंच आठवत नाही..
पाहत राहतो बाहेर.. हाताची घडी करून.. कोपरावर डोकं ठेऊन.. पाहत राहतो.. हे निसर्गाचं देणं..
कुठेतरी संबंध जाणवतो इथल्या मातीचा.. इथल्या वासाचा.. आणि माझा.. कुठेतरी.. त्याशिवाय ही ओढ नाही.. ह्या मातीतलाच मी.. ह्या मातीतच जाणार..
थोडी दुनियादारी.. थोडा मध्ये काळ जाणार.. पण शेवटी फिरून मात्र इथेच येणार.. शेवटी फिरून मी इथेच येणार..

- रोहित

विक्रांत

कविता जगलास मित्रा

Rohit Dhage

केदार मेहेंदळे

khup chan...

Rohit Dhage