सोन्याची पाउले-०१

Started by lelekedar, June 29, 2012, 06:12:08 PM

Previous topic - Next topic

lelekedar

माय माझी माउली
माझ्या घरी पाहुणी
सोन पाउले तिची
उमटली माझ्या अंगणी

किती वाट पाहिली
गात्रे गेली थकुनी
गुण आळविता तुझे
शीणली होती वाणी

रामप्रिय जाना अशी
आली सत्वर धाउनी
केशरांचे सडे घातले
वाट सजविली फुलांनी

चाहूल तिची लागता
दुखे जाती पळूनी
भांडार सुखाचे घेऊन
उभी वैकुंठाची  राणी

भाव अर्पिला सारा
माथा ठेविला चरणी
अमोघ आशिष लाभता
कृतकृत्य मी जीवनी

केदार लेले

केदार मेहेंदळे

chan bhkti git....

hya veles site var baryach bhaktichya kavita aani abhang post zale aahe... mala watat pandhrichya varicha ha prasad aahe.