पाउसधारा

Started by lelekedar, June 30, 2012, 12:06:57 PM

Previous topic - Next topic

lelekedar

डोंगर रांगावरून आली मेघांची माला
अमृत वर्षावाने न्हाऊ घातले धरणीला

सळसळली पाने वेलीr शहारल्या
उधाणाचे गीत सुचले सागराला

बावरलेली पाखरे जाती आडोशाला
कसे थोपवावे या उन्मत्त वाऱ्याला

पाउसधारा अशा बेधुंद बरसल्या
मातीच्या वासाने आसमंत दरवळला

सोहळा पाहण्या हा भास्करही डोकावला
माउलीच्या मंदिराचा कळस उजळला

Kedar Lele


केदार मेहेंदळे

hi kavita vachun tari paus yeu de....

chan kavita