अंगण

Started by lelekedar, June 30, 2012, 12:17:13 PM

Previous topic - Next topic

lelekedar

माझ्या अंगणात तुलसीचे वृंदावन
घराघराला देई आरोग्याचे दान

लाल फुलांनी बहरले जास्वंदीचे झाड
वाऱ्यासंगे डौलती उंच उंच माड

आम्र वृक्षावर कोकीळ शिळ घालतो
पेरूच्या झाडावर राघूंचा गोतावळा राहतो

पुढल्या बाजूला उभा वृक्ष  औदुम्बरू
क्षणभर विसावती तिथे माझे सद्गुरू

एका रांगेत मोगरा बहरून आला
प्राजक्त सुवासाने आसमंत दरवळला

मागच्या बाजूला फोफावला कडूनिंब
गुलाबी पिवळे पांढरे  डोलती गुलाब

वृक्ष वेलींनी भरले माझे अंगण
नित्य वसे इथे माझा देव गजानन


Kedar Lele



केदार मेहेंदळे

eka sundar agnach chitr dolya pudhe aal.... chan kavita kedarji..