" सिंधुताई सकपाळ यांना अर्पण "

Started by कवि - विजय सुर्यवंशी., July 01, 2012, 02:52:19 PM

Previous topic - Next topic

कवि - विजय सुर्यवंशी.

" सिंधुताई सकपाळ यांना अर्पण "
.
.
.
सावळ्याची माता,रामाची जननी,
तरी अनाथाला पुसणारं जगी नाही कुणी....
.
.
.
वाट चुकलेल्या या वासरा,
जगी कुणी ना दिला आसरा....
.
.
.
संकटमोचनी तुझा पदर,
जाहला दिनांचा आधार....
पालटण्या दुबळ्याचा प्रहर,
सोशिलास रुढीन्चा कहर....
.
.
.
जरी आई एक नाव असतं,
कुठल्या अनाथाच्या ते भाग्यात असतं....??
.
.
.
श्वापदांच्या या जगती,
जन्मदात्रीनं सोडून दिलं....
हव्यासाच्या या नभी,
बछड हरवून गेलं....
.
.
.
रुढीन्च्या हिंस्र पशुंचा,
जिथं पहारा होता....
बुडत्या अनाथाला सिंधुमाई,
आशेचा तुझा किनारा होता....
.
.
.
येणाऱ्या प्रत्येक दिन अन रातीला....
उदंड आयुष्य लाभों अनाथांच्या या आईला....
 
.
.
.                                      कवि - विजय सुर्यवंशी .
      (यांत्रिकी अभियंता )     

केदार मेहेंदळे



कवि - विजय सुर्यवंशी.

#3
thanx ... केदार SIR...

कवि - विजय सुर्यवंशी.