गुरु

Started by lelekedar, July 04, 2012, 08:12:44 PM

Previous topic - Next topic

lelekedar

आई, तुझ्यासारखा गुरु पुन्हा भेटलाच नाही......

आठवते हाती दिली होती तूच पाटी
हात धरुनी माझा गिरविली अक्षरे गोमटी
सुंदर अक्षर परत कधीच आले नाही
तुझ्यासारखा गुरु पुन्हा भेटला नाही

सुंदर चित्रे काढावयास शिकवणार होतीस
रंग रेषांच्या दुनियेत घेऊन जाणार होतीस
रंगांचा पंखा परत कधी फुललाच नाही
तुझ्यासारखा गुरु पुन्हा भेटला नाही

शिकवणार होतीस मला छान छान गाणी
विहारणार होतो आपण सुरांच्या बनी
सूर तालानी माझ्याकडे पहिले पण नाही
तुझ्यासारखा गुरु पुन्हा भेटला नाही

भेटूच आपण तेव्हा रागावू नकोस ना!
वेडं लेकरू तुझं समजून घे ना!
तुझ्याविना दिशा कुठली सापडलीच नाही
तुझ्यासारखा गुरु पुन्हा भेटलाच नाही

केदार लेले

केदार मेहेंदळे

khup cha kavita.......

3/7/12 la guru paurnima hoti.

rutekar486


विक्रांत

कविता आवडली .
 
विक्रांत