अवघी काया

Started by विक्रांत, July 06, 2012, 02:00:15 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

अवघी काया शिनली आता अवघी माया आटली
आतबाहेर पुकार  आता इथली वस्ती संपली
खूप घेतले खूप वाटले बाकी काही नाही उरले
त्या वाटेवर नजर आता साथी मागे राहिले
तो कैफही छान होता पण मजा आता नुरली
आग लागली आत आता दवा तिला न  कुठली
व्याकुळलेले  प्राण माझे  तन मन अधीर झाले
चल गुंडाळ वस्ती इथली भोग इथले सरले

विक्रांत
http://kavitesathikavita.blogspot.in/

केदार मेहेंदळे

chan kavita... shabd rachana awadli

विक्रांत