....मनात येण जाण आहे

Started by कुसुमांजली, July 06, 2012, 09:56:58 PM

Previous topic - Next topic

कुसुमांजली

आठवणीचा मेघ सावळा हलकेच बरसून जावा
आणि त्यातला प्रत्येक क्षण मोरपिस होउन रहावा
तो मोरपिसारा उलगडण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

समुद्राची नज़र चुकवत लाट किनार्यावर धावुन यावी
आणि उमटणारया तुझ्या पाउलांमध्ये अलगद विरून जावी
पाउलखुणा त्या जपण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

क्षितिजाच्या भाळावरल्या चित्रकर्मीची फसगत व्हावी
आणि मुखाकमला वरती तुझीया सप्तरंगांची उधळण करावी
सप्तरंग ते टिपण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

फुलांची होणारी बागेशी ओळख ही कळीपाशीच थांबावी
आणि अंगणात तुझीया स्वप्नसुमनांची पखरण व्हावी
स्वप्ना फुलात त्या रमण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

विशाल तव हृदयाची आसमंता ही भुरळ पडावी
आणि लक्ष लक्ष तारकांना तुझी ओंजळही पुरून उरावी
साक्षीदार तया होण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

कंठातल्या अस्फुट शब्दांनी एकदा तरी वाट चुकावी
आणि अबोल तुझ्या डोळ्यांना सुरमय करून जावी
प्रेम आर्त सुर ते छेडण्यासाठी
तुझ्या मनात माझ येण जाण आहे

तुझ्यात राहून तुलाच फितविण्याचा हा सर्व बहाणा आहे
सागरानेही कधीतरी सरितेकडे झेपावे म्हणुन असेल कदाचित
......माझ्या मनात मात्र तुझ हे येण न परतु पाहे

Shrikant R. Deshmane

श्रीकांत रा. देशमाने.

[ कविता म्हणजे कागद,
लेखणी अन् तू... ]

केदार मेहेंदळे