तगमग

Started by कुसुमांजली, July 07, 2012, 12:59:49 PM

Previous topic - Next topic

कुसुमांजली



जिथे कलत्या सूर्या बरोबर आकाशही चालू लागे
तिथे मध्यान्हीचे चटके सहन करावे...तरी कितीदा हे

आणि आज कुठेतरी आभाळ बरसू पाहे भरभरून 
परंतु डोळ्यातला झरा तर कधीच गेलाय आटुन

तरी सुद्धा मी अनेकदा निपटून काढली...माझ्याच ह्रिदयातली सल
परी व्रण बुजताच परत उचंबळून येते...त्याच आठवणींची कळ

जळीत जीवाची तगमग मी आता कायमची शमवणार आहे
तुझ्या कैफेत झोकुन, हे जीवन साधका, स्वतःला सावरणार आहे 


केदार मेहेंदळे