*माय*

Started by amolbarve, July 07, 2012, 08:25:59 PM

Previous topic - Next topic

amolbarve

* माझी कविता *
*माय*
मायेच्या ह्या ओंजळीत रे
स्तबध्ले विश्वाचे उगमस्थान
इवल्याश्या हृद्यात साठवला
करुणारूपी परमार
कसे गाऊ तुझे गान आई,कसे गाऊ तुझे गान आई!

देवलोकीच्या अमृतालाही
फिके तुझे स्तनपान
इंद्राच्या त्या वज्राश्राला
धुळीत मिळवतील हात
कसे गाऊ तुझे गान आई,कसे गाऊ तुझे गान आई!

आयुष्यातील सुख दुखातही
बळकट तुझे स्थान
कैलासाच्या उंच शिखरावरील
तूच ती पालनहार
कसे गाऊ तुझे गान आई,कसे गाऊ तुझे गान आई!

शब्द हि आता तोडके झालेत
विसरलोय मी माझे भान
गाताना तुझे गान
सांग माउली कसे फेडू तुझे उपकार आता, कसे फेडू तुझे उपकार !

केदार मेहेंदळे