आभाळबाबा

Started by janki.das, July 08, 2012, 03:28:56 PM

Previous topic - Next topic

janki.das


आजी म्हणायची..
'आभाळबाबा बघतोय बरं वरून...'


च्रोरून साखर खाताना..
बयो बाईच्या अंगणात आंबे चोरतांना..
डबकयातली बेड़क दगडांनी मोजताना...
'आजी आजारी होती' शाळेत कारण सांगताना ..
वाटेतल्या खड्ड्यावर झावळ्या टाकतान्ना..
त्यावरून आपटल्यावर फिदफिदतांना....


नजर हळूच वर जायची ....
ढगातुन कुणी बघत का ?
ढगातुन कुणी बडबडतय का...?


मग हळुहळु कमी झाले ... वर बघणे नाही ...
आंबे चोरण ...
बेडूक मोजण ..
वगैरे वगैरे...


शाळेत मारामा-या झाल्या की मी वर पहायचा ...
कापुस डावी कडून सरकत उजवी कड़े जायचा ...
वाटायच आता आभाळ बाबा रागावणार
त्या गड़का-याच्या पावट्याला बदडणार...


तो बदडून निघून जायचा ...
मी
शिवाईच्या डोंगरावरून आभाळबाबाला दगड़ मारायचा ..


इतक्यात कुठ वीज बरसली ...
अन पावट्यचि घराची कौल घसरली ..


मी हसत किना-यावरून नाखाव्याला ओरडून सांगायचा..
"हुडी आभळाला टेकल तेव्हा आभाळबाबाला पत्ता दाव घरचा "....




एकदा आजी निघून गेली ...


होती तिथाच पण आपले म्हणायचे निघून गेली ....


मी म्हणायचा "बोलावा माघारी "
आई रडायची "गेली रे तुझ्या आभाळबाबाच्या घरी .."


मी शिवाईवरून बोंब ठोकाय्चा...
नाखाव्यासोबत चक्कर मारायचा ...
"तो" काही बोलना ..
बोलायला "तो" काही भेटंना..




मग मी सुरु केलं ..परत ..


बेड़क मोजायला ..
झावळ्या तोडायला..
नाराळावर चढून पानी संपवायला ..
बयो बाईला नको नको करायला...




सगळे म्हणायचे ...
आजीनच ठेवल होत शेफारून..
पण मला माहिती होत ...
आजी म्हणायची,'आभाळबाबा बघतोय बरं वरून.."


-- By प्राजक्त