चिराकालीचा फिरता

Started by janki.das, July 08, 2012, 03:41:19 PM

Previous topic - Next topic

janki.das


घनदाट दाट दाटीयले ,
पण मेघ बरसले नाही ;
मी अंतरात पेटलो होतो ,
पण डोळ्यांचे दीप उजळले नाही.


रोगाला मुक्त मी केले ,
सिद्धीला तृप्त ही केले ;
मी तपास तप करवियले ,
पण आत्म्याचे ज्ञान गवसले नाही.


माझे पाय हिमाचल गगनी ,
संध्येला अंतिम अवनी ;
मी सत्व जाणतो संजीवनीचे तरीही ,
या मृत्यूचे गुढ उकलले नाही .


अंगात माझिया लाख सूर्याची आच ,
डोळ्यांत परंतु भेदरलेला भास ;
मी अस्त्रांचा अन शस्त्रांचा स्वामी ,
पण घुबड रातीचे भय दडपले नाही .


मी शुभ्र वस्त्रे वाहतो अंगा वरती ,
अन भळभळणारी जखम हि माथ्यावरची ;
मी फक्त प्राशितो दुग्ध इतकी वर्षे ,
पण रक्तातील पीठ बदलले नाही .


मी ऋतू - ऋतूतील बदल पहिले अवघे ,
अन युग - युगातील साठमारीचे खेळ ;
मी ' अश्वत्था ' चिराकालीचा फिरता ,
पण शापाचे शल्य हे सरले नाही .


अभिषेक मु.प्रभुदेसाई

sudhanwa

घनदाट दाट दाटीयले....
excellent start and nice thought..throughout :)

-Sudhanwa