पाऊस

Started by krupali 1, July 08, 2012, 11:51:51 PM

Previous topic - Next topic

krupali 1

मुंबईचा पाऊस आणि भाईगिरी (आजपर्यंत 'पाऊस आणि हिरवळ','पाऊस आणि विरह ' ,'पाऊस आणि गारवा' ह्या
सर्व संकल्पना सोडून पाऊसही करू लागला भाईगिरी)
मी आलोय!!!
एक बार जो मैने commitment कर दी , फिर मैं अपने आप कि भी नही सुनता! क्या?
आपुनने बोला था न आऊंगा, मैं कायको छुपके बैठू?
मी कोणाचं घोडं  मारलंय? चांगलं ताडताड band बाजा वाजवत आणि धाड धाड कोसळत ...
मी आलोय!!!
अब traffic जॅम हो जाये या ट्रेन्स लेत हो जाये, मुझे पर्वा नही !
रस्त्यारस्त्यावर खड्डे होवोत किंवा खड्ड्यात पाणी भरो , मला पर्वा नाही,
कुणाच्या बापाची भीती आहे का मला ?
चांगलं ताडताड ......
मी आलोय!!!!
खूप आळशीपणा केलात तुम्ही, छत्री न नेण्याचा, raincoat  न नेण्याचा , आता हि ओझी तुम्हाला वाहायलाच लागतील!
पावसात भिजून तुम्हाला ताप ,सर्दी , खोकला झाला तर, मला पर्वा नाही,
तुम्हीच बोलावलत न येरे येरे पावसा , म्हणून ,
चांगलं ताडताड......
मी आलोय !!!
आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पोहोचायला उशीर होऊन, 'Sorry हं , मला थोडा उशीर झाला!' असं म्हणून-म्हणून थकलात तरी चालेल ,
घरा बाहेर पडताना तुम्हाला मला पाहून (भाई ला पाहून पडते तशी) धडकी भरली, नव्या कोऱ्या साडीवर भूरकन चिखल उडवीत गाडी गेली  किंवा
कोणी चिखलात घसरून पडले ,तरी मला पर्वा नाही,
माझ्या वाटेकडे डोळे लावून बसला होतात न? म्हणूनच,
चांगलं ताडताड ........
मी आलोय!!!
किसने बोला था कि नलसे पानी नही आता आंखोंसे आता है, इसलिये मैं आया हू न?अब भरपेट पाणी पिनेका और
आरामसे नहानेका ,समझा क्या?चिंता नही करनेका ,
चांगलं ताडताड ......
मी आलोय!!!!!!!!!!!
एकबार जबान दिया तो दिया ,क्या?
एकबार जो मैने committment दी ,फिर मैं अपने आप कि भी नही सुनता, क्या?
---
By Krupa T, Nagpal

केदार मेहेंदळे


MK ADMIN

#2
ha ha...jaam bhari :)

moving it to "others" section ...karan he "Prem kavita" nahi  ;)

Krupa T. Nagpal