"प्रेमी परी"

Started by moraya, July 09, 2012, 06:01:12 PM

Previous topic - Next topic

moraya

पाहुनी तुला सर्वात वेगळा
पडले मी तुझ्या प्रेमात  |
मिळालास तू मला म्हणून
मी नाचले मना मनात ||

माझे नाचणे फार नाही टिकले
त्यासी कुणी तरी नजरेने वेढले |
अचानक दूर गेलास
या सत्याने जंग जंग पछाडले ||

पाहते होते वाट अजूनही
मिळशील हि आशा मनस्वी |
पण आशा हि आशाच राहते
त्यातून मिळत  नाही सत्य सर्वस्वी ||

आता मात्र जगणे काठीन  झाले
तू नाहीस या भावनेने मनही मूर्छीत  झाले |
मग मात्र  मला राहवले नाही
सरळ  मृत्यूस कवटाळूनी मी मोकळी झाले ||

परंतु

अजूनही माझे शोधणे संपले नाही
परी बनुनीहि तू मजला गवसला नाही |
उरी काहूर माजला
तू मजला अजून कसा काय  गवसला नाही ?????? ||

गेला नसशील ना  कोणाच्या तरी भाव विश्वाचा  हिस्सा बनून ????
मनातील दुख गिळून मी मात्र राहिली आहे फक्त  एक "प्रेमी परी" बनून ||
{तुझीच प्रेम वेडी परी}
मोरया .....

केदार मेहेंदळे

kavita chan aahe ... pan mala vatat hi virah kavitet post vhayla havi nahi ka?

sylvieh309@gmail.com

hmmmmm evvvvdha prem jar kadhi konawar kela aasel tar te milaL pahije asa watata :'(