निमंत्रण..- 1

Started by Rohit Dhage, July 10, 2012, 01:02:12 AM

Previous topic - Next topic

Rohit Dhage

http://marathikavita.co.in/index.php/topic,9022.0.html
(Continue..)
आज जो गेला तो शनिवार.. आजही तिचा कॉल आला नव्हता.... तिचा कॉल इतक्या सहजी येईल हे मलाही अपेक्षित नव्हतंच.. प्रश्न असाही मनात येत होता की तिनं जर काही विचारलं सांगितलं असेल तर त्या होत्या फक्त २ lines.. त्या २ lines नी आज अख्खा शनिवार डोक्याचा एक भाग व्यापला होता..फक्त २ lines.. आणि तो उद्याही व्यापलेला असेल ह्याची थोडीफार खात्री.. आणि आजसारखंच  उद्याचीही ती तगमग वाया जाणार ह्याचीही.. पण तरीही जे होईल ते होईल हे धरूनच चाललं पाहिजे..

आज रात्र रविवारची.. जसं की मला अपेक्षित होतंच.. तिचा आजही कॉल आला नाही.. आणि त्याच हिशोबाने माझाही करायचा प्रश्नच आला नाही.. प्रश्नच नव्हता.. त्यात माझी संध्याकाळ नेमकी त्या पाहुण्याकडे गेली ज्याच्या शेजारी ही राहते! खाली जेव्हा जमलेलो तेव्हा हिला पहिल्याचा भासही झाला!! भास होता... डोक्याचा व्यापला तो भाग अर्धा होता की पूर्ण शंकाच वाटते..! चालायचंच.. उद्या जर का विषय निघाला तर भेटणंच ठरवून टाकायचं.. जास्त भाव न खाता! म्हणजे माझाही attitude दिसून येणार नाही.. planning  planning किती planning !!! एवढं planning करून नव्हतं करायचं प्रेम मला..अगदी खरंखुरं सामोरं जायचं ठरवलेलं मी.. तिच्या नशिबातच नव्हतं त्याला काय करणार.. चालायचंच.. हेही चालायचंच..

 
- रोहित