तू गेल्यावर

Started by mvd76, July 11, 2012, 04:50:37 PM

Previous topic - Next topic

mvd76

शब्दांचीही भीती वाटावी
अशी अक्षरं शत्रू बनल्येत
सगळ्या आकड्या शब्दांमध्ये
माझ्या दुक्खाचे लेख कोरल्येत

लिहायलाही आता शब्दांची....
भिक मागावी लागते.
कोण...काय लायकी आमची?
भांवानांची तहान अश्रुंवर भागते

भरून आलंय...आठवणींचं आभाळ
पण सगळीकड शब्दांचा दुष्काळ,
भेगालाला जीव; कोरडा सगळा भाळ
मनात पेटतो वणवा, डोक्यात झाला जाळ

अनेक प्रश्न सभोवारी नाचती
सदैव लपाछापिचा खेळ मांडती
हरवले दीप...तरी नुसत्याच जळत्या वाती
संपला गणगोत...आता नावालाच नाती

संसारचे चक्र दुर्दैवी
सगळी नुसती सारवा सारवी
सगळ्यांच सखा पाठीराखी
परी कुणीही ना दिसती सुखी

पुरे आता हि संसार गाथा
तुटली ती तुटली नाथा
टेकीला तव चरणी माथा
दूर करावी तव माझी व्यथा

आता ना फिरेन माघारी
चित्त माझे तुमच्याच मंदिरी
नको तो आड, नको ती दरी
जोडा माझी नाळ घ्या तव उदरी

तव नाम मुखी
मज ठेवी सुखी
तव पायाची मी धूळ
तुटला प्रपंचा समूळ

केदार मेहेंदळे